Manasvi Choudhary
वजन कमी करण्यासाठी चालणे की धावणे, असा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठी या वेबस्टोरीतून जाणून घ्या दोन्हीपैंकी योग्य पर्याय कोणता?
चालल्याने आणि धावल्याने वजनावर कसा परिणाम होतो, ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
धावताना शरीराची ऊर्जा जास्त खर्च होते, त्यामुळे कमी वेळेत जास्त कॅलरीज बर्न होतात.
चालण्यामुळेही कॅलरीज कमी होतात, परंतु यासाठी तुम्हाला धावण्याच्या तुलनेत जास्त वेळ चालावे लागते.
साधारणपणे, चालण्याच्या तुलनेत धावण्यामुळे दुप्पट कॅलरीज जलदगतमीने जळतात, ज्यामुळे चरबी वेगाने कमी होण्यास मदत होते.
धावल्याने मेटाबॉलिझ्म झपाट्याने बूस्ट होतो आणि वर्कआउट संपल्यानंतरही काही वेळ शरीरात कॅलरीज बर्न होत राहता.
जर तुम्ही रोज १ तास वेगाने चालले तर शरीराची स्ट्रक्चरल फॅट्स हळूहळू आणि सुरक्षितपणे कमी होण्यास मोठी मदत मिळते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.