5 Healthy Drinks For Cholesterol And Heart: बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रोज प्या ‘ही’ 5 हेल्दी ड्रिंक्स; हृदयासाठीही ठरतील फायदेशीर

Manasvi Choudhary

बॅड कोलेस्ट्रॉल

शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास हृदयविकारासंबंधित गंभीर आजारांचा धोका उद्भवू शकतो.

5 Healthy Drinks For Cholesterol And Heart | saam tv

5 हेल्दी ड्रिंक्स

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणे गरजेचे आहे. दररोज रिकाम्या पोटी तुम्ही हेल्दी ड्रिंक्सचे सेवन केले तर तुम्हाला फरक दिसून येईल.

Fruit Juice | pinterest

संत्र्याचा रस

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. रिकाम्या पोटी संत्र्याचा रस प्यायल्याने शरीरातील मेटाबॉलिज्म सुधारतो आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते.

Orange Juice

आवळ्याचा रस

आयुर्वेदामध्ये आवळा हा आरोग्यासाठी गुणकारी मानला जातो. आवळ्याच्या रसात व्हिटॅमिन सी आणि अमिनो ॲसिड असते, जे रक्त शुद्ध करून शरीरातील अतिरिक्त चरबी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर आहे.

Amla Juice

कलिंगडाचा रस

कलिंगडाचा रस प्यायल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते.

watermelon juice

क्रॅनबेरीचा रस

क्रॅनबेरी ज्यूसमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. हे ड्रिंक शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास महत्वाचे ठरते.

Cranberry Juice | Yandex

डाळिंबाचा रस

डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स उच्च प्रमाणात असतात. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये साचलेले प्लॅक साफ होण्यास मदत होते.

pomegranate Juice | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

Yandex

next: ३० दिवस रोज जवस खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या जवसाचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Flaxseeds | pinterest
येथे क्लिक करा...