Running or Swimming: हृदय निरोगी ठेवण्यासाठी धावणं की पोहणं? कोणता व्यायाम ठरतो अधिक फायदेशीर?

Shruti Vilas Kadam

धावण्यामुळे हृदय मजबूत होण्यास मदत

धावणं हा उत्तम कार्डिओ व्यायाम आहे. नियमित धावल्यामुळे हृदयाची कार्यक्षमता आणि शारीरिक सहनशक्ती वाढण्यास मदत होते. वेगाने चालण्यापासून सुरुवात करून हळूहळू जॉगिंग करावी.

Running | pinterest

पोहण्यामुळे हृदयाच्या आरोग्याला फायदा

पोहणं हा संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे. यामुळे हृदयाची गती वाढते, सहनशक्ती सुधारते आणि अनेक स्नायू सक्रिय होतात. त्यामुळे सांध्यांच्या त्रासामुळे धावणं कठीण जाणाऱ्या व्यक्तींसाठी पोहणं चांगला पर्याय ठरू शकतं.

Swimming | pinterest

कॅलरी बर्न करण्यासाठी कोणता व्यायाम चांगला?

धावणं आणि पोहणं या दोन्ही व्यायामांमुळे कॅलरी बर्न होतात. मात्र, किती कॅलरी बर्न होतील हे व्यायामाचा वेळ आणि व्यक्तीचं वजन यावर अवलंबून असतं.

Running or Swimming

सांध्यांसाठी पोहणं ठरू शकतं फायदेशीर

धावताना गुडघे, घोटे आणि इतर सांध्यांवर वारंवार ताण येतो. याउलट, पाण्यात शरीराला आधार मिळत असल्याने पोहताना सांध्यांवरील ताण तुलनेने कमी येतो. सांधेदुखी किंवा जास्त वजन असलेल्या व्यक्तींना पोहणं सोयीचं वाटू शकतं.

Running or Swimming | pinterest

रक्तदाबासाठी दोन्ही व्यायाम उपयुक्त

नियमित धावणं किंवा पोहण्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. मात्र, हाय ब्लड प्रेशर किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Running or Swimming | Canva

किती वेळ व्यायाम करावा?

आठवड्याला किमान १५० मिनिटे व्यायाम करण्याचं उद्दिष्ट ठेवावं. धावणं आणि पोहणं याचा फायदा शरिराला होतो. सुरुवातीला कमी वेळ व्यायाम करून हळूहळू वेळ वाढवावा.

Running or Swimming

हृदयासाठी धावणं की पोहणं, काय निवडावं?

हृदयाच्या आरोग्यासाठी धावणं आणि पोहणं हे दोन्ही उत्तम व्यायाम आहेत. सांध्यांचा त्रास नसल्यास धावणं शरिरासाठी बेस्ट आहे. तर, कमी ताणाचा व्यायाम हवा असल्यास पोहणं फायदेशीर ठरू शकतं.

Running or Swimming

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Running or Swimming | Saam Tv

Nail Art Designs: फेस्टिव्ह आउटफिटसोबत ट्राय करा सुंदर नेल आर्ट डिझाइन्स, पाहा हे ७ ट्रेंडी डिझाईन्स

Nail Art Designs | Saam Tv
येथे क्लिक करा