Nail Art Designs: फेस्टिव्ह आउटफिटसोबत ट्राय करा सुंदर नेल आर्ट डिझाइन्स, पाहा हे ७ ट्रेंडी डिझाईन्स

Shruti Vilas Kadam

मिनिमल नेल आर्ट

साध्या आणि एलिगंट लुकसाठी न्यूड, पिंक किंवा पीच रंगांच्या नेलपेंटचा वापर करा. नखांवर छोटे ठिपके, बारीक रेषा किंवा नक्षी काढून सुंदर डिझाइन तयार करता येते.

Nail Art | GOOGLE

फ्लोरल नेल आर्ट

फुलांच्या डिझाइनमुळे नखांना नाजूक आणि आकर्षक लुक मिळतो. पांढरी, गुलाबी किंवा पिवळी छोटी फुलं काढून तुम्ही सण, पार्टी किंवा रोजच्या वापरासाठी सुंदर नेल आर्ट करू शकता.

Nail Art | GOOGLE

फ्रेंच टिप नेल आर्ट

नखांच्या टोकांना पांढरा रंग आणि बेसला हलका गुलाबी किंवा न्यूड शेड देऊन फ्रेंच टिप डिझाइन करता येते. ऑफिस, कॉलेज आणि कार्यक्रमांसाठी हा क्लासिक पर्याय आहे.

Nail Art | GOOGLE

ग्लिटर नेल आर्ट

चमकदार नखं आवडत असतील, तर गोल्डन, सिल्व्हर किंवा रोझ गोल्ड ग्लिटर वापरा. सर्व नखांवर ग्लिटर लावण्याऐवजी एक-दोन नखांवर ग्लिटर लावल्यास आकर्षक लुक मिळतो.

Nail Art | Saam Tv

ओम्ब्रे नेल आर्ट

दोन रंग एकमेकांत सुंदरपणे मिसळून तयार केलेले ओम्ब्रे डिझाइन सध्या लोकप्रिय आहे. पिंक आणि व्हाइट, पीच आणि न्यूड किंवा जांभळ्या रंग वापरून आकर्षक ग्रेडिएंट लुक मिळवता येतो.

Nail Art | GOOGLE

जिओमेट्रिक नेल आर्ट

रेषा, त्रिकोण, चौकोन आणि विविध भौमितिक आकारांचा वापर करून मॉडर्न नेल आर्ट करता येते. ब्लॅक, व्हाइट आणि न्यूड रंगांचं कॉम्बिनेशन नखांना हटके लुक देतं.

Stone & 3D Nail Art | Pintrest

क्रोम नेल आर्ट

मेटॅलिक आणि मोत्यांसारखी चमक असलेलं क्रोम नेल आर्ट पार्टी किंवा लग्नसमारंभासाठी छान दिसतं. सिल्व्हर, गोल्डन किंवा पर्ल शेड्स निवडून नखांना ग्लॅमरस आणि ट्रेंडी लुक देता येतो.

Types Of Nail Extension | Saam Tv

Sabja Pudina Water Benefits: उन्हात शरीराला थंडावा देण्यासाठी प्या सब्जा-पुदिन्याचं पाणी; मिळतील हे ७ फायदे

Sabja Pudina Water Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा