Running Benefit: रोज 20 मिनिटे धावल्याने शरीरात होतात हे 7 आरोग्यदायी फायदे

Shruti Vilas Kadam

हृदयाचे आरोग्य सुधारते

नियमित धावल्याने रक्ताभिसरण सुरळीत राहते. त्यामुळे हृदय अधिक कार्यक्षम बनते आणि हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.

Running | saam tv

वजन कमी करण्यास मदत होते

धावताना मोठ्या प्रमाणात कॅलरी बर्न होतात. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.

Running | yandex

फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते

रोज धावल्याने श्वसनक्रिया सुधारते. शरीराला अधिक ऑक्सिजन मिळाल्यामुळे फुफ्फुसे अधिक सक्षमपणे कार्य करू लागतात.

Running | yandex

स्नायू आणि हाडे मजबूत होतात

धावण्यामुळे पाय, कंबर आणि शरीराच्या इतर भागांतील स्नायूंना बळकटी मिळते. तसेच हाडांची घनताही टिकून राहण्यास मदत होते.

Running

मानसिक तणाव कमी होतो

धावताना शरीरातून एंडॉर्फिन हार्मोन्स स्रवतात, ज्यामुळे मन प्रसन्न राहते. तणाव, चिंता आणि नैराश्याची भावना कमी होण्यास मदत होते.

Running | yandex

स्टॅमिना वाढतो

दररोज 20 मिनिटे धावल्याने शरीराची सहनशक्ती वाढते. त्यामुळे दिवसभर अधिक उत्साही आणि सक्रिय वाटते.

Running | canva

झोपेची गुणवत्ता सुधारते

नियमित शारीरिक हालचालीमुळे शरीराला नैसर्गिक थकवा येतो. त्यामुळे रात्री शांत आणि गाढ झोप लागण्यास मदत मिळते.

Running | canva

तुमची पण त्वचा खूप ऑयली आहे? मग या फेसमास्कमुळे चेहरा नॉर्मल होऊन मिळेल नॅचरल ग्लोईंग स्किन

Face Care
येथे क्लिक करा