Shruti Vilas Kadam
एका वाटीत २ मोठे चमचे तांदळाचे पीठ घ्या. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट पेस्ट तयार करा. इच्छित असल्यास गुलाबपाणीही वापरू शकता.
तांदळाच्या पिठामध्ये असलेले पोषक घटक त्वचेचा निस्तेजपणा कमी करून चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो मिळवून देण्यास मदत करतात.
तांदळाचे पीठ सौम्य स्क्रबप्रमाणे काम करते. त्यामुळे त्वचेवरील मृत पेशी दूर होऊन चेहरा अधिक स्वच्छ आणि तजेलदार दिसतो.
तेलकट त्वचा असलेल्या लोकांसाठी तांदळाच्या पिठाचा फेसपॅक उपयुक्त ठरू शकतो. तो त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत करतो.
नियमित वापरामुळे त्वचा मऊ, गुळगुळीत आणि निरोगी दिसण्यास मदत होते. त्वचेचा एकसारखा पोत राखण्यासाठीही हे फायदेशीर ठरू शकते.
सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर तयार पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर समान प्रमाणात लावा. 15-20 मिनिटे सुकू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.
संवेदनशील त्वचा असल्यास प्रथम पॅच टेस्ट करा. कोणतीही जळजळ, खाज किंवा अॅलर्जी जाणवल्यास वापर थांबवा. आठवड्यातून 1 ते 2 वेळाच हा फेसपॅक वापरणे योग्य ठरते.