Manasvi Choudhary
केसांच्या आरोग्यासाठी रोझमेरी तेल लावणे फायदेशीर आहे. रोझमेरी तेल केसांना लावल्याने केसांची वाढ होते.
माहितीनुसार, रोझमेरी तेल केसांना लावल्यास औषधाप्रमाणे काम करते. केसांच्या वाढीसह केस दाट होण्यासाठी उपयुक्त आहे.
रोझमेरी तेल केसांना लावल्याने रक्ताभिसरण सुधारते यामुळे केसांची मुळे पुन्हा सक्रिय होतात.
रोझमेरी तेलामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स केसांच्या मुळांना मजबुती देतात व केसगळती रोखतात.
केसांना रोझमेरी तेलाने मसाज केल्याने केसांची लांबीच नाही केसांचा पोत देखील सुधारतो. केस दाट दिसतात.
१ चमचा खोबरेल तेल किंवा बदामाच्या तेलात ४-५ थेंब रोझमेरी ऑईल मिसळा. या मिश्रणाने टाळूवर १० मिनिटे मसाज करा आणि १ तासाने केस धुवा.
पाण्यात रोझमेरीची पाने उकळून ते पाणी स्प्रे बाटलीत भरून रोज टाळूवर मारल्यास केस वेगाने वाढतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.