Manasvi Choudhary
गुलाबपाणी हा आयुर्वेदिक उपाय म्हणून वापरले जाते. त्वचेच्या अनेक समस्यांवर घरगुती उपाय म्हणून गुलाबपाण्याचा वापर केला जातो.
त्वचेसाठी टोनर म्हणून गुलाबपाण्याचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहितीये का? केसांना गुलाबपाणी लावल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात.
गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यां आणि पाणी हे मिश्रण उकळून तुम्ही हे गुलाबपाणी बनवू शकता.
केसांना गुलाबपाणी लावल्याने केसांना फायदा होतो. टाळूला होणारी जळजळ तसेच खाज कमी करण्यासाठी तुम्ही गुलाबपाणी लावा यामुळे थंडावा मिळेल.
गुलाबपाण्यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म केसांतील कोंडा कमी करण्यास मदत करतात.
केस शायनी आणि सिल्की होण्यासाठी केसांना गुलाबपाण्याने धुवू शकता.
झोपण्यापूर्वी टाळूला गुलाबपाणी लावून तुम्ही हलक्या हाताने मसाज करा यामुळे फायदा होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.