Manasvi Choudhary
आजकाल हृदयविकाराचा धोका हा कोणत्याही वयात उद्भवू लागला आहे. तरूणापासून ते वयोवृद्धांपर्यत हृदयविकाराचा धोका वाढला आहे.
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर काही संकेत देतं ती ओळखली तर तुम्ही वेळीच वैद्यकीय सल्ला घेऊ शकता.
हृदयविकाराशी संबंधित लक्षणे ही फक्त छातीत जाणवत नाही तर शरीराच्या इतर भागतही जाणवतात. पायांमध्ये तुम्हाला कोणती लक्षणे दिसली तर सावध होणे जाणून घ्या.
हृदय कमकुवत झाल्याची लक्षणे पायांमध्ये सुद्धा दिसतात.
जेव्हा हृदयाकडून शरीरात रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही तेव्हा शरीरात रक्त पायांच्या दिशेने साठू राहते पायाला सूज येते.
हृदयाचे कार्य नीट होत नसेल तर चालताना त्रास होतो, धाप व प्रचंड थकवा लागतो. पायांना गोळा येण्याच्या समस्या उद्भवतात.
पायाच्या सुजलेल्या भागावर अंगठ्याने किंवा बोटाने काही सेकंद जोरात दाबून धरा. बोट काढल्यानंतर जर तिथे बराच वेळ खड्डा राहिला तर समजून जा की शरीरात पाणी जमा झालं आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.