Siddhi Hande
उद्यापासून व्हॅलेंटाइन वीक सुरु आहे. हा आठवडा प्रेम व्यक्त करायचा आठवडा असतो. व्हॅलेंटाइन वीकमधील पहिला दिवस म्हणजे रोझ डे.
रोझ डेला आपल्या पार्टनरला लाल रंगाचे गुलाब द्यायचे असते. फक्त लाल रंगाचे फुल का देतात ते जाणून घ्या.
लाल रंग हा प्रेमाचे प्रतिक समजला जातो.तुम्ही तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला गुलाब देऊ शकतात.
आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी लाल गुलाब हेच उत्तम गिफ्ट असते.
लाल रंगाचे फुल एखाद्या व्यक्तीचे कौतुक किंवा आदर करण्यासाठीही दिले जाते.
गुलाबी रंगाचे फुल तुम्ही आभार व्यक्त करण्यासाठी जवळच्या व्यक्तीला देऊ शकतात.
पिवळा रंग हा मैत्रीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे मैत्रीचा हात पुढे करण्यासाठी पिवळ्या रंगाचे गुलाब द्या.
सफेद रंग हा शांततेचं प्रतीक आहे. त्यामुळे कोणी तुमच्यावर रागावले असेल किंवा बोलणे बंद केले असेल तर त्या व्यक्तीला हे फूल द्या.