Room Number 13: कोणत्याही हॉटेलमध्ये १३ नंबरची खोली का नसते? जाणून घ्या यामागची ७ रंजक कारणं

Shruti Vilas Kadam

१३ अंकाबद्दलची अंधश्रद्धा

अनेक पाश्चात्त्य देशांमध्ये १३ हा अंक अशुभ मानला जातो. त्यामुळे काही हॉटेल्स १३ नंबरची खोली किंवा १३वा मजला ठेवणे टाळतात.

Dont Touch To Washroom Doors To Maintain Hygiene | Saam Tv

ग्राहकांची मानसिकता

काही पाहुणे १३ नंबरच्या खोलीत राहण्यास नकार देतात. त्यामुळे ग्राहकांची अस्वस्थता टाळण्यासाठी हॉटेल व्यवस्थापन हा क्रमांक वापरत नाही.

Fingerprint door lock

व्यवसायावर परिणाम होऊ नये

१३ नंबरची खोली रिकामी राहण्याची शक्यता असल्याने हॉटेल्स हा क्रमांक वगळून थेट १२ नंतर १४ नंबर किंवा १२A नंबर देतात.

Doors

परदेशातील परंपरेचा प्रभाव

अमेरिका, कॅनडा आणि युरोपमधील अनेक इमारतींमध्ये १३वा मजला नसतो. त्यांच्यासाठी १३ नंबर हा शुभ नसतो.

Why doors have box design | saam tv

धार्मिक आणि सांस्कृतिक समजुती

काही धार्मिक कथांमुळे आणि ऐतिहासिक समजुतींमुळे १३ या अंकाला दुर्दैवाशी जोडले जाते. त्यामुळे काही लोक हा अंक टाळतात.

Door design modern architecture

सर्व हॉटेल्समध्ये हा नियम नसतो

प्रत्येक हॉटेल १३ नंबर टाळतेच असे नाही. अनेक आधुनिक हॉटेल्स आणि इमारती कोणतीही अंधश्रद्धा न मानता १३ नंबरची खोली ठेवतात.

Doors | Freepick.com

ही केवळ व्यावसायिक रणनीती असू शकते

१३ नंबरची खोली न ठेवणे हा कायदेशीर नियम नाही. ग्राहकांच्या पसंतीचा विचार करून काही हॉटेल्स हा निर्णय घेतात, जेणेकरून बुकिंगवर परिणाम होऊ नये.

Door

Kanjivaram Paithani Saree: लग्नसमारंभ, देणार कार्यक्रमात उठून दिसायचंय? मग एकदा पाहाच या 7 सुंदर कांजीवरम पैठणी साड्या

Kanjivaram Paithani Saree design | AI/ Saam tv
येथे क्लिक करा