Shreya Maskar
रोहिडा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे आणि तो भोर तालुक्यामध्ये वसलेला आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात रोहिडा किल्ल्याला आवर्जून भेट द्या.
रोहिडा किल्ल्याला विचित्रगड, बिनीचा किल्ला असेही म्हणतात. रोहिडा किल्ल्यावर सात बुरुज आहेत. बुरुज विशेष मजबूत आणि भव्य आहेत.
रोहिडा किल्ला हा ट्रेकिंगसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. कारण येथील निसर्गरम्यता पाहून तुमचे मन भारावून जाईल. ट्रेकिंगसाठी एक मध्यम-सोपा पर्याय आहे.
रोहिडा किल्ला यादव काळात बांधला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहिडा किल्ला जिंकला होता.
रोहिडा किल्ला हा सह्याद्रीच्या डोंगररांगेत, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात, नीरा नदीच्या खोऱ्यात असलेल्या रोहिड खोऱ्यात वसलेला आहे.
रोहिडा किल्ल्यावर रोहिडमल्ल मंदिर आहे. रोहिडा किल्ल्यावर पाण्याची टाकी आणि अनेक ऐतिहासिक गोष्टी आहेत.
रोहिडा किल्ला कॅम्पिंगसाठी उत्तम आहे, विशेषतः हिवाळ्यात, कारण हवामान आल्हाददायक असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.