Shreya Maskar
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात गोद्री गावाजवळ डालकीचा धार नावाचा एक सुंदर धबधबा आहे. 'डालकी धबधबा' म्हणूनही ओळखला जातो.
डालकीची धार धबधबा अजिंठा डोंगररांगेत आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथील सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते.
गोद्रीच्या जवळ बाहुबली आणि सीडी घाट यांसारखे इतर धबधबे देखील आहेत. हे धबधबे सिल्लोड तालुक्यातील औरंगाबाद जिल्ह्यात आहेत.
येथे घनदाट झाडी आणि उंच खडकांमधून कोसळणारे पाणी पाहायला मिळते. तुम्ही येथे मित्रांसोबत ट्रेकिंगचा प्लान करू शकता.
ट्रेकिंग आणि फोटोग्राफी डालकीची धार धबधबा हे लोकेशन बेस्ट आहे. पांढरा शुभ्र धबधबा पाहून तुमच्या मनाला भुरळ पडेल.
पावसाळ्यात डालकीची धार धबधबा मोठ्या प्रमाणात प्रवाहित होतो. जो पर्यटकांना आकर्षित करतो.
डालकीची धार धबधब्याच्या परिसरात हिरवेगार वातावरण पाहायला मिळते. येथे आल्यावर तुमच्या मनाला शांती मिळेल. तुमचा मूड फ्रेश होईल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.