Manasvi Choudhary
जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ हा आहारातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मात्र, आजकाल अधिक मीठाच्या सेवनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत.
उच्च रक्तदाब ही सोडियमच्या अतिसेवनामुळे निर्माण होणारी एक प्रमुख समस्या आहे. यासाठी आजकाल अनेकजण आहारात साधे मीठऐवजी सैंधव मीठ वापरण्याचा सल्ला देतात. मात्र, या दोन्ही मिठांमधील फायदे आणि फरक माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे.
अनेकांचा असा समज असतो की, सैंधव मीठ हे पांढऱ्या मिठापेक्षा खूप चांगले असते आणि हे मीठ रोजच्या आहारात वापरल्याने शरीराला कोणतीही हानी पोहोचत नाही.
वैद्यकीय सल्ल्यानुसार, पांढरे मीठ हे प्रक्रिया केलेले असते, ज्यामध्ये आयोडीन मिसळले जाते. हे आयोडीन थायरॉइड आणि मेंदूच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक मानले जाते.
लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी आयोडीनची गरज असते, जी सैंधव मीठातून पूर्ण होत नाही कारण सैंधव मीठामध्ये आयोडीन नसते.
सैंधव आणि साधे मीठ या दोन्ही प्रकारच्या मिठांमध्ये सोडियम क्लोराइडचे प्रमाण समप्रमाणात असते.
अनेकांचा असा समज असतो की, सैंधव मीठामध्ये मिनरल्सचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे ते साध्या मिठापेक्षा जास्त फायदेशीर ठरते. मात्र, वैद्यकीय माहितीनुसार, सैंधव मीठावर प्रक्रिया केली जात नाही, ज्यामुळे त्यामध्ये काही प्रमाणात मिनरल्स टिकून राहतात.
आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे मीठ अतिप्रमाणात खाणे टाळा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.