Manasvi Choudhary
आजकाल अनेकजण सकाळी चहा- कॉफीऐवजी ग्री टी पितात. ग्रीन टी आरोग्यासाठी गुणकारी मानली जाते.
चहा- कॉफीऐवजी ग्रीन टी प्यायल्याने शरीराला काय फायदे होतात ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, पचनक्रिया वाढणारे घटक असतात ज्यामुळे ग्रीन टी हे शक्तिशाली ड्रिंक ओळखले जाते.
वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर आहे. शरीरातील चरबी नैसर्गिकरित्या घटवण्यासाठी ग्रीन टी प्या. ग्रीन टी मध्ये कॅटेचिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे शरीराचा चयापचय वेगवान करते. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी आणि वजन नियंत्रणात आणण्यास मदत होते.
दुधाचा चहा प्यायल्याने अनेकदा ॲसिडिटी किंवा पोट फुगण्याचा त्रास होतो. यामुळे तुम्ही ग्रीन टी प्या. जी पचनास अत्यंत हलकी असते आणि पचनसंस्था मजबूत ठेवण्यास मदत होते.
ग्रीन टी नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंकचे काम करतो. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकून दिले जातात आणि त्वचा उजळ व निरोगी होण्यास मदत होते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
ग्रीन टी प्यायल्याने एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. शरीराला ऊर्जा मिळते. ग्रीन टी मध्ये कॅफिनचे प्रमाण खूप कमी असते यामुळे मेंदू शांत राहतो, मानसिक ताण कमी होतो आणि दिवसभर ऊर्जा व एकाग्रता टिकून राहते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.