नवरात्रीच्या उपवासाला साध्या मिठाऐवजी सैंधव मीठच का खातात? जाणून घ्या

Manasvi Choudhary

सैंधव मीठाचे सेवन

नवरात्रीमध्ये उपवासाला साध्या मीठाऐवजी सैंधव मीठाचे सेवन केले जाते. साधे मीठ नवरात्रीच्या उपवासाला टाळले जाते. यामागचे कारण आणि सैंधव मिठाचे फायदे जाणून घ्या.

Rock Salt | Yandex

आरोग्यासाठी फायदेशीर

सैंधव मीठ हे अतिशय शुद्ध आणि आरोग्यदायी मानले जाते. उपवासाला सैंधव मीठ का वापरतात? त्याची कारणे जाणून घ्या.

Rock Salt | Yandex

साधे मीठ

साधे मीठ हे समुद्राच्या पाण्यावर रासायनिक प्रक्रिया करून तयार केले जाते. तर सैंधव मीठ हे नैसर्गिक मीठ असते. सैंधव मिठावर कोणतीही प्रक्रिया होत नाही.

salt | pinterest

रासायनिक प्रक्रिया होत नाही

सैंधव मीठ खाणीतून काढलेले असते. यात कोणत्याही रसायनांचा वापर होत नसल्याने धार्मिकदृष्ट्या ते सर्वात शुद्ध मानले जाते.

salt | pinterest

पचनक्रिया सुधारते

उपवासाच्या दिवशी सैंधव मीठ खाल्ल्याने अन्न पचते आणि पोट साफ राहण्यास मदत होते.

digestion | pinterest

शरीराला एनर्जी मिळते

सैंधव मीठामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ही पौष्टिक घटके असतात त्यामुळे शरीराला एनर्जी मिळते.

Rock Salt Benefits | Yandex

उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो

साध्या मिठाच्या तुलनेत सैंधव मीठामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते. त्यामुळे उपवासाच्या काळात उच्च रक्तदाबाचा त्रास होत नाही.

blood pressure | pinterest

शरीराला थंडावा मिळतो

उपवासाच्या अन्नामुळे किंवा पोट रिकामे राहिल्यामुळे पोटातील उष्णता वाढते. सैंधव मीठ पोटातील जळजळ शांत करते आणि शरीराचे तापमान संतुलित ठेवते.

Rock Salt Benefits | Saam Tv

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Guava Vs Custard Apple : पेरू की सिताफळ, आरोग्यासाठी कोणतं फळ फायदेशीर?

Guava Vs Custard Apple
येथे क्लिक करा..