Manasvi Choudhary
बाजारात सध्या पेरू आणि सिताफळचा सीझन सुरू आहे. हे दोन्ही फळे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात.
पेरू आणि सिताफळ या दोन्ही फळापैंकी आरोग्यासाठी कोणतं फळ जास्त फायदेशीर आहे? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
पेरूमध्ये व्हिटॅमिन ‘सी’ हे गुणधर्म असल्याने पेरू खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.
पेरूमध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाचे विकार दूर होतात.
पेरूचा 'लो ग्लायसेमिक इंडेक्स' असतो. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी पेरूचे सेवन फायदेशीर आहे.
सिताफळात आयर्नचे प्रमाण असते ज्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.