7 Foods For Long Hair Growth: केसांच्या वाढीसाठी 7 पदार्थ ठरतील बेस्ट

Manasvi Choudhary

अंडी

अंडी आरोग्यासाठी अत्यंत हेल्दी मानली जातात. अंड्यामध्ये प्रथिने आणि बायोटिन असल्याने केसांसाठी देखील फायदेशीर मानली जातात. अंडी खाल्ल्याने केसांची मुळे मजबूत होतात आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.

Egg | pinterest

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह , फोलेट, व्हिटॅमिन 'ए' आणि 'सी' भरपूर असते यामुळे हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने केसांच्या पेशी मजबूत होतात. केस गळतीही कमी होते.

green leafy vegetables | pintrest

मासे

आहारात मासांचे प्रमाण असल्याने केसांना फायदा होतो. माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन 'डी' असते. हे घटक टाळूचे आरोग्य निरोगी ठेवतात आणि केस दाट करण्यास मदत करतात.

Fish Fry

सुकामेवा आणि बिया

बदाम, अक्रोड, जवस आणि सूर्यफूलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन 'ई', झिंक आणि हेल्दी फॅट्स असतात. हे टाळूचे रक्ताभिसरण सुधारून केसांची वाढ वेगाने करतात.

Nuts & Seeds | pintrest

कडधान्ये

मूग, मटकी, चणे या कडधान्यांमध्ये प्रथिने, लोह, झिंक आणि बायोटिनने असते. केसांच्या पोषणासाठी कडधान्यांचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते.

Legumes/Pulses | pinterest

दही

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स आणि व्हिटॅमिन बी५ असते, जे केसांच्या मुळांना पोषण देते. दही खाल्ल्याने किंवा त्याचा हेअर मास्क लावल्याने कोंडा दूर होतो आणि केस चमकदार बनतात.

Curd | GOOGLE

रताळे

रताळ्यामध्ये बीटा-कॅरोटीन भरपूर असते, ज्याचे रूपांतर शरीरात व्हिटॅमिन 'ए' मध्ये होते. हे व्हिटॅमिन टाळूवरील नैसर्गिक तेलाचे प्रमाण नियंत्रित ठेवते, ज्यामुळे केस कोरडे पडत नाहीत.

Sweet Potato | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Soaked Walnut Vs Dry Walnuts
येथे क्लिक करा...