Shreya Maskar
भाजलेल्या पेरूची चटणी बनवण्यासाठी पेरू, हिरवी मिरची, गूळ, बडीशेप, चाट मसाला, लाल तिखट, कोथिंबीर, मीठ इत्यादी साहित्य लागते.
पेरू आणि मिरची स्वच्छ धुवून भाजून घ्यावे.
मिक्सरला गूळ आणि बडीशेपची बारीक पेस्ट करून घ्या.
एका पॅनमध्ये थोडे पाणी घालून बडीशेप आणि गुळाची पेस्ट भाजून घ्या.
आता या पेस्टमध्ये भाजलेला पेरू, मिरची, चाट मसाला आणि लाल मिरची पावडर घालून छान मॅश करा.
मंद आचेवर ही पेस्ट परतून त्यात कोथिंबीर, मीठ घाला.
शेवटी ही पेस्ट एकदा मिक्सरला वाटून घ्या. चमचमीत पेरूची चटणी तयार झाली.
४-५ दिवस ही चटणी फ्रिजमध्ये राहू शकते.