भाजलेले चणे सोलून की सालीसकट खावे ? आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर?

Manasvi Choudhary

भाजलेले चणे

टाईमपास म्हणून आपण सर्वजण भाजलेले चणे खातो. चणे आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदेशीर आहेत.

Roasted Chana Benefits

चणे खाण्याची योग्य पद्धत

मात्र चणे खाताना नेहमी एक प्रश्न पडतो, तो म्हणजे चणे सोलून की सालीसकट खावे? यासाठी आज आम्ही तुम्हाला चणे खाण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत.

Roasted Chana Benefits

चणे सालीसकट खाणे फायदेशीर?

आरोग्याच्या दृष्टीने चणे 'सालीसकट' खाणे अधिक फायदेशीर आहे. कारण चण्याच्या सालीमध्ये फायबर असते, जे शरीराची पचनक्रिया सुधरवण्यास मदत करतात.

Roasted Chana Benefits

पचनक्रिया होते मजबूत

सालीसकट चणे खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. ज्यांना बद्धकोष्ठता, आम्लपित्त, गॅस, अॅसिडीटी, जळजळचा त्रास आहे अश्या व्यक्तींनी चणे सालीसकट खावे.

Roasted Chana Benefits

वजन कमी होण्यास मदत

चण्याच्या सालीमधील फायबरयुक्त गुणधर्मामुळे पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

Roasted Chana Benefits

कोलेस्ट्रॉल आणि शुगर कंट्रोल

सालीसकट चणे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.

Roasted Chana Benefits

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: रोज कोथिंबिरचं पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल होतात?

Coriander Water
येथे क्लिक करा...