Manasvi Choudhary
कोथिंबीरीच्या पाण्यात नैसर्गिक डिटॉक्सिफायिंग गुणधर्म असतात. रोज हे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात
वजन कमी करण्यासाठी कोथिंबीरचं पाणी फायदेशीर आहे. कोथिंबीरचं पाणी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते.
कोथिंबीरीचं पाणी प्यायल्याने इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते. हे पाणी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
कोथिंबीरीच्या पाण्यातील अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीमुळे त्वचेवरील मुरुम , पिंपल्स आणि डागांची समस्या कमी होऊन चेहऱ्यावर ग्लो येतो.
तुम्हाला जर पोट फुगणे, अपचन, गॅस किंवा बद्धकोष्ठता या समस्येचा त्रास असेल तर तुम्ही कोथिंबीरच्या पाण्याचे सेवन करा.
एका ग्लासात पाणी घ्या. त्यात ताजी कोथिंबीरची पाने भिजत घाला, किंवा एक चमचा धने भिजत घालू शकता.
सकाळी उठल्यानंतर हे पाणी तुम्ही कोमट करून प्या.