Manasvi Choudhary
नदीचे पाणी स्वच्छ, निर्मळ आणि निळेशार असते. मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का नदीचे पाणी एवढे स्वच्छ कसे असते. नदीचे पाणी स्वच्छ करण्याची प्रक्रिया असते.
वाढते शहरीकरण आणि प्रदूषणामुळेअनेक नद्यांमध्ये कचरा, प्लास्टिक आणि रसायने मिसळते यामुळे नदीचे पाणी गढूळ होते नदीचे पाणी स्वच्छ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान कार्यप्रणाली काम करते.
नदी स्वच्छ करण्याची सुरुवात पाण्याच्या वरच्या भागावर तरंगणारा कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या काढून होते. हा कचरा नदीचे पाणी पुढे वाहून नेण्यापूर्वीच उपकरणांच्या साहाय्याने गोळा केला जातो.
नदीच्या पाण्यातील घाण, प्रदूषण, सूक्ष्म जीवाणू आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी आधुनिक गाळण तंत्रज्ञान प्रणालीचा वापर केला जातो. या प्रक्रियाद्वारे पाणी शुद्ध करून पुन्हा नदीत सोडले जाते.
नदीच्या तळाशी साचलेला गाळ, चिखल आणि कचरा काढण्यासाठी अवजड मशीनचा वापर केला जातो. यामुळे नदीचे पात्र खोल होते आणि पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुधारतो.
आधुनिक प्रकल्पांमध्ये पर्यावरणपूरक पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी आणि नैसर्गिक समतोल राखण्यासाठी विशेष जल वनस्पती प्रणाली विकसित केल्या जातात.
नद्या स्वच्छ ठेवणे हे एक अत्यंत खर्चिक काम आहे. एका छोट्या किंवा शहरी नदीच्या देखभालीसाठी वार्षिक साधारण ५० लाख ते ५ कोटी रुपयांचा खर्च येतो. तर, गंगा किंवा गोदावरीसारख्या मोठ्या आणि विस्तीर्ण नद्यांच्या स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करावा लागतो.