Shreya Maskar
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात संभाजी शहाजी भोसले यांची भूमिका बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याने साकारली आहे.
'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला रिलीज झाला आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत पाहायला मिळत आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत रितेश देशमुख झळकला आहे.
संभाजी शहाजी भोसले हे शहाजी आणि जिजाबाई यांचे थोरले पुत्र होते. तसेच ते छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरला भाऊ होते.
संभाजींच्या जन्माच्या वेळी शहाजी राजे हे अहमदनगरच्या दरबारात सेनापती होता. अफझलखानाने कनकगिरीवर केलेल्या हल्ल्यात संभाजी राजे मारले गेले.
संभाजी राजांचा जन्म १६२३ मध्ये झाला. संभाजी राजे स्वराज्यासाठी लढले. संभाजी राजे १६५५ मध्ये झालेल्या कनकगिरीची लढाईत शहीद झाले. त्यांनी अफझल खानाची युद्ध केले.
विजापूरचा सरदार अफझल खान १६५९ ला महाराष्ट्रातील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांशी झालेल्या भेटीदरम्यान मारला गेला.
संभाजी शहाजी भोसले गनिमी कावा आणि मैदानी युद्धात अत्यंत निपुण होते. ते एक शूर योद्धा होते. 'स्वराज्य' स्थापनेच्या कार्यास त्यांनी पाठिंबा दिला.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक माहिती पोहचवणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.