Raja Shivaji : छत्रपती! 'राजा शिवाजी'च नव्हे तर 'या' ५ शिवाजी महाराजांच्या चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर घातलाय धुमाकूळ

Shreya Maskar

राजा शिवाजी

१ मे ला रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकला आहे. तसेच त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. चित्रपटाने पहिल्या वीकेंडला ४० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.

Raja Shivaji | instagram

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटात शिवरायांच्या भूमिकेत महेश मांजरेकर झळकले आहेत. महेश मांजरेकर यांनी 'राजा शिवाजी'मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा लखुजी जाधव यांची प्रमुख भूमिका साकारली.

Me Shivajiraje Bhosale Boltoy | google

पावनखिंड

'पावनखिंड' हा चित्रपट 2022 ला रिलीज झाला. या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्वराज्यासाठीच्या बलिदानाची गाथा सांगण्यात आली आहे. या चित्रपटाने चांगली कमाई केली.

Pawankhind | google

तानाजी: द अनसंग वॉरियर

अभिनेता शरद केळकरने 'तान्हाजी' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अजय देवगन याने सुभेदार तान्हाजी यांची भूमिका साकारली. शरद केळकर यांनी साकारलेली महाराजांची भूमिका आजही चाहत्यांच्या अंगावर काटा आणते.

Tanhaji: The Unsung Warrior | google

शेर शिवराज

चिन्मय मांडलेकर 'शेर शिवराज' चित्रपट खूप गाजला. चित्रपटातील चिन्मय मांडलेकरची भूमिका लय भारी होती. 'शेर शिवराज' हा दिगपाल लांजेकर दिग्दर्शित 'श्री शिवराज अष्टक' मालिकेतील आहे.

Sher Shivraj | google

फत्तेशिकस्त

२०१९ मध्ये 'फत्तेशिकस्त' चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली पुण्यात शाइस्तेखानावर करण्यात आलेल्या धाडसी आणि गुप्त 'सर्जिकल स्ट्राईक'चे चित्रण करतो. बुद्धिमत्ता आणि शौर्याचा येथे संगम पाहायला मिळतो.

Fatteshikast | google

सरसेनापती हंबीरराव

2022 मध्ये 'सरसेनापती हंबीरराव' चित्रपट रिलीज झाला. प्रवीण तरडे मुख्य भूमिकेत झळकले. सरसेनापती हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील मराठा साम्राज्याचे अत्यंत पराक्रमी आणि निष्ठावान सरसेनापती होते.

Sarsenapati Hambirrao | google

NEXT : अमोल कोल्हे ते रितेश देशमुख, आतापर्यंत कोणत्या अभिनेत्यांनी साकारली शिवरायांची भूमिका?

Riteish Deshmukh-Raja Shivaji | instagram
येथे क्लिक करा...