Rishabh Pant: ऋषभ पंतने मोडला धोनीचा वर्ल्ड रेकॉर्ड, रचला इतिहास

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारत विरुद्ध इंग्लंड

भारत आणि इंग्लंड यांच्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. पहिली फलंदाजी करताना भारतीय संघाने चांगली सुरुवात केली आहे.

rishabh pant | google

ऋषभ पंत

भारताचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतने १७८ चेंडूवर १३४ धावा करत दमदार खेळी खेळली. त्याने १४६ चेंडूवर आपले दमदार शतक पूर्ण केले.

rishabh pant | google

नंबर वन विकेटकिपर

२७ वर्षीय ऋषभ पंतने आपल्या कारकिर्दीतील सातवे शतक झळकावत दिग्गज विकेटकिपर महेंद्र सिंह धोनीचा विक्रम मोडला. पंत कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतक ठोकणारा विकेटकिपर फलंदाज बनला.

rishabh pant | google

एम एस धोनी

महेंद्र धोनीने ९० कसोटी सामन्यांमध्ये ६ शतके झळकावली आहेत.

rishabh pant | google

शतक

ऋषभ पंतने ४४ कसोटीमध्ये धोनीची रेकॉर्ड मोडीस काढला. पंतने शोएब बशीरच्या चेंडूवर षटकार मारुन आपले शतक पूर्ण केले. इंग्लंडच्या भूमीवर ऋषभ पंतचे हे तिसरे शतक आहे.

rishabh pant | google

विकेटकिपर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या विकेटकिपरच्या यादीत पंत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत फक्त कुमार संगकारा, एबी डिव्हिलियर्स, मॅट प्रायर आणि बीजे वॉटलिंग आहेत.

rishabh pant | google

लीड्स

लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात पंतच नाही तर सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल यांनीही शतके झळकावली. यशस्वीने १५९ चेंडूत १०१ धावा आणि गिलने २२७ चेंडूत १४७ धावा केल्या.

rishabh pant | google

रेकॉर्ड्स

यापूर्वी २००६ मध्ये वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड आणि मोहम्मद कैफ यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध एका डावात शतके झळकावली होती. २००२ मध्ये द्रविड, तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी इंग्लंडविरुद्ध शतके झळकावली होती.

rishabh pant | google

NEXT: नागपूरपासून हाकेच्या अंतरावर वसलंय एक सुंदर हिल स्टेशन, इथे एकदा नक्की जा

hill Station | ai
येथे क्लिक करा