Sara Gurpal: क्रिकेट विश्वात खळबळ! अभिनेत्रीला आले भारतीय खेळाडूंचे मेसेज? सेहवागने भर मंचावर केली पोलखोल

Shruti Vilas Kadam

‘राइज अँड फॉल 2’मध्ये सारा गुरपालची एन्ट्री

‘राइज अँड फॉल 2’ला दणक्यात सुरुवात झाली असून यामध्ये सारा गुरपाल सहभागी झाली आहे. पंजाबी अभिनेत्री आणि सिंगर म्हणून सारा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.

Sara Gurpal

प्रीमियरमध्ये केला मोठा खुलासा

शोच्या प्रीमियर नाइटमध्ये साराने क्रिकेटर्सशी संबंधित एक खास खुलासा केला. अनेक क्रिकेटर्स तिला मेसेज करत असल्याचे तिने स्टेजवर सांगितले. तिच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

Sara Gurpal

वीरेंद्र सेहवागने विचारला थेट प्रश्न

शोचे होस्ट वीरेंद्र सेहवागने साराला, अनेक क्रिकेटर्सनी तुला DM केल्याचे ऐकले आहे, असे विचारले. त्यावर सारानेही अनेक क्रिकेटर्स तिला मेसेज करत असल्याचे स्पष्ट केले.

Sara Gurpal

साराने दाखवला मोबाईलमधील मेसेज

यानंतर सेहवागने साराचा फोन पाहण्याची इच्छा व्यक्त केली. साराने फोन दाखवत काही मेसेज असे आहेत की ते पाहून तुम्हाला मला ओरडावेसे वाटू शकते, असे मिश्कीलपणे सांगितले.

Sara Gurpal

सेहवागची मजेशीर प्रतिक्रिया

साराचा फोन पाहिल्यानंतर सेहवाग आश्चर्यचकित झाला. एका क्रिकेटरचा मेसेज पाहून त्याने, ‘यानेही मेसेज केला आहे, म्हणूनच कदाचित रन होत नाहीत,’ अशा आशयाची मजेशीर प्रतिक्रिया दिली.

Sara Gurpal

‘लेफ्टी, राइटी आणि कीपरही’

सेहवागने पुढे साराच्या फोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्रिकेटर्स असल्याचे सांगत ‘लेफ्टी, राइटी आणि कीपर’ असा उल्लेख केला. मात्र नेमके कोणत्या क्रिकेटर्सनी तिला मेसेज केले, हे साराने स्पष्ट केलेले नाही.

Sara Gurpal

शोमध्ये अनेक सेलिब्रिटींचा सहभाग

‘राइज अँड फॉल 2’मध्ये स्वरा भास्कर, गौतम गुलाटी, करण पटेल, शहजाद पूनावाला, काजल राघवानी आणि तेज प्रताप यादव यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या आहेत.

Sara Gurpal

Pista Benefits: रोज सकाळी पिस्ता खाऊन करा दिवसाची सुरुवात, शरीराला मिळतील 'हे' 7 आरोग्यदायी फायदे

Pista Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा