Shruti Vilas Kadam
पिस्त्यामध्ये असलेले असंतृप्त फॅट्स आणि इतर पोषक घटक संतुलित आहाराचा भाग म्हणून हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
पिस्त्यामध्ये प्रथिने, हेल्दी फॅट्स आणि कॅलरीज असल्याने सकाळी मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास दिवसभरासाठी ऊर्जा मिळण्यास मदत होऊ शकते.
पिस्त्यामध्ये आहारातील फायबर असते. त्यामुळे योग्य प्रमाणात सेवन केल्यास पचनक्रिया सुरळीत राहण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत होऊ शकते.
पिस्त्यामधील प्रथिने आणि फायबरमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे अनावश्यक खाणे कमी करण्यास मदत होऊ शकते.
पिस्त्यामध्ये ल्युटीन आणि झिअॅक्सँथिनसारखे अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे पोषक घटक आहेत.
पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन ई, प्रथिने आणि इतर पोषक घटक असतात. संतुलित आहारासोबत त्यांचे सेवन त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
पिस्त्यामध्ये फायबर, प्रथिने आणि हेल्दी फॅट्स असल्याने संतुलित आहाराचा भाग म्हणून त्यांचे सेवन रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकते.