Momo Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा गरमागरम आणि चटपटीत मोमोज; वाचा रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

मैदा – २ कप, कोबी – १ कप बारीक चिरलेला, गाजर – ½ कप बारीक चिरलेले, कांदा – १ बारीक चिरलेला, शिमला मिरची – ½ कप बारीक चिरलेली, आले-लसूण – १ चमचा बारीक चिरलेले, सोया सॉस – १ चमचा, काळी मिरी पूड – ½ चमचा, मीठ – चवीनुसार, तेल – १-२ चमचे, पाणी – आवश्यकतेनुसार

Momo Recipe

पीठ मळून घ्या

एका भांड्यात मैदा, थोडे मीठ आणि तेल घ्या. पाणी घालून मऊसर पीठ मळून घ्या. पीठ झाकून १५ ते २० मिनिटे ठेवा.

Momo Recipe

भाजीचे सारण तयार करा

कोबी, गाजर, कांदा आणि शिमला मिरची बारीक चिरून घ्या. कढईत थोडे तेल गरम करून लसूण आणि आले परतून घ्या.

Momos Recipe | Social Media

सारण परतून घ्या

त्यात चिरलेल्या भाज्या घालून मोठ्या आचेवर काही मिनिटे परता. चवीनुसार मीठ, काळी मिरी आणि सोया सॉस घालून मिश्रण तयार करा.

Atta Momos Recipe

मोमोजच्या पुऱ्या लाटा

तयार पीठाचे छोटे गोळे करून त्याच्या पातळ पुऱ्या लाटून घ्या. पुरी फार जाड किंवा फार पातळ नसावी.

Momo Chutney Recipe | Social Media

सारण भरा

प्रत्येक पुरीच्या मध्यभागी तयार केलेले भाजीचे सारण ठेवा. पुरीच्या कडा एकत्र करून मोमोजला आकर्षक आकार द्या आणि घट्ट बंद करा.

Momo Chutney Recipe | Social Media

मोमोज वाफवून घ्या

स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवा. मोमोज स्टीमर प्लेटवर ठेवून साधारण १० ते १२ मिनिटे वाफवून घ्या. गरमागरम मोमोज लाल तिखट चटणी किंवा मोमोज सॉससोबत सर्व्ह करा. घरच्या घरी तयार केलेले मोमोज स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय ठरतील.

Momo Chutney Recipe | Social Media

Eye Makeup Tips: डोळे दिसतील सुंदर आणि आकर्षक; फक्त मेकअप करताना फक्त या २ गोष्टी करा

Eye Makeup Tips | Saam Tv
येथे क्लिक करा