ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या दररोजच्या वापरातील वस्तूपासून स्वयंपाक घरातील वस्तूमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे.
आधी स्वयंपाक घरात चूल होती नंतर शेगडी मात्र त्याची जागा आता काही प्रमाणात इलेक्ट्रिक शेगडीने घेतलेली आहे.
सध्या मोठ्या शहरात अनेकांच्या घरी इलेक्ट्रिक शेगडी दिसून येते.
मात्र इलेक्ट्रिक शेगडी वापरताना तुम्ही या चूका करत नाही ना.
इलेक्ट्रिक शेगडीवर एखादा पदार्थ करताना त्यावर इलेक्ट्रिक शेगडीपेक्षा जास्त वजनाचे भांडे ठेवू नका.
इलेक्ट्रिक शेगडी साफ करताना सावधगिरी बाळगा नाही तर शॉक बसण्याची शक्यता असते.
इलेक्ट्रिक शेगडीवर जेवण बनवण्यासाठी काही विशिष्ट भांड्याचा वापर करता येत नाही. त्यामुळे खरेदी करताना सर्व माहिती जाणून घ्यावी.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.