ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम,झिंक,आयरन, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स आढळतात. या बिया एक प्रकारे सुपरफूड आहेत.
भोपळ्याच्या बियांमध्ये ट्रिप्टोफॅन असते जे तणाव, नैराश्य कमी करण्यास आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकते.
तज्ञ्जांच्या मते, भोपळाच्या बिया खाण्याची कोणतीही ठराविक योग्य वेळ नाही. परंतु सकाळी या बियांचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात.
प्रोटीन भरपूर असल्याने व्यायामानंतर या बियांचे सेवन करु शकता. या बियांमध्ये आढळणारे मॅग्नेशियम स्नायूंना आराम देते. व्यायामानंतर अधिक उर्जेसाठी या बिया फळे किंवा दह्यासोबत खाऊ शकतात.
भोपळ्याच्या बियांमध्ये ट्रिप्टोफॅन भरपूर प्रमाणात असते, जे शरीराला सेरोटोनिन आणि मेलाटोनिन 'स्लीप हार्मोन्स' तयार करण्यास मदत करते.
ज्यांना हेल्दी नाश्ता आवडतो ते लाडू किंवा एनर्जी बारमध्ये या बिया मिक्स करुन सेवन करु शकतात.
तुम्ही तुमच्या स्मूदीमध्ये १ ते २ चमचे या बिया घालून हेल्दी नाश्त्याचा आनंद घेऊ शकता. या बिया सूप किंवा सॅलडमध्ये मिक्स करुन देखील खाऊ शकता.