Diabetes: ब्लड शुगर लेव्हल चेक करण्याची योग्य वेळ कोणती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डायबिटीज

डायबिटीज हा एक असा आजार आहे. जे योग्य आहार, औषधं आणि लाइफस्टाइलशी संबधित आहे. परंतु ब्लड शुगर लेव्हल टेस्ट करायची योग्य वेळ कोणती, जाणून घ्या.

diabetes | freepik

फास्टिंग ब्लड शुगर टेस्ट

ही सर्वात सामान्य आणि विश्वासार्ह टेस्ट आहे. यामध्ये, व्यक्तीला रात्रभर काहीही न खाता किंवा पिता, म्हणजे किमान ८ तासानंतर रक्त तपासणी करावी लागते. ही टेस्ट सकाळी करावी लागते.

Diabetes | yandex

पोस्टप्रान्डियल ब्लड शुगर टेस्ट

ही टेस्ट जेवणानंतर बरोबर २ तासांनी केली जाते. खाल्ल्यानंतर शरीर किती साखरेची प्रक्रिया करू शकते यामधून हे स्पष्ट होते. सकाळचा नाश्ता किंवा दुपारच्या जेवणानंतर ही टेस्ट करु शकता.

Diabetes | Saam TV

रॅंडम ब्लड शुगर टेस्ट

ही टेस्ट दिवसाच्या कोणत्याही वेळी केली जाऊ शकते. तुम्ही जेवलेले असो वा नसो तरीही ही टेस्ट करु शकता.

Diabetes | freepik

HbA1c टेस्ट

या टेस्टमधून तुम्हाला गेल्या तीन महिन्यांत तुमच्या रक्तातील साखरेची सरासरी पातळी किती आहे हे कळते. हे ३ महिन्यांतून एकदा करता येते.

Diabetes | Saam Tv

परिणाम

जर रक्तातील साखर चुकीच्या वेळी तपासली गेली तर त्याचा परिणाम केवळ रिपोर्टवरच नाही तर उपचार आणि औषधांवरही होऊ शकतो.

Diabetes | saam tv

डॉक्टरांचा सल्ला

नेहमीच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार टेस्ट करा आणि निर्धारित वेळेचे पालन करा.

Diabetes | yandex

NEXT: तुम्हीही केळी फ्रिजमध्ये ठेवता? जाणून घ्या योग्य पद्धत

Banana | freepik
येथे क्लिक करा