Shreya Maskar
बाहेर जाताना डावा डोळा फडफडणे अशुभ मानले जाते. यामागचे नेमकं शास्त्र आणि विज्ञान जाणून घेऊयात.
ज्योतिषशास्त्रानुसार, डावा किंवा उजवा डोळा फडफडणे याचा शुभ-अशुभ संकेतांशी संबंध जोडला जातो. पुरुष आणि स्त्रियांसाठी काही परंपरांमध्ये याचे अर्थ वेगवेगळे मानले जातात.
पुरुष बाहेर जाताना उजवा डोळा फडफडला तर शुभ संकेत मानले जातात. चांगली बातमी मिळणे, कामात यश मिळणे, एखादी सकारात्मक भेट होणे याचा संकेत मानतात.
बाहेर पडताना पुरुषांचा डावा डोळा फडफडणे म्हणजे अशुभ मानले जाते. कामात अडथळे, अनपेक्षित खर्च, कामात विलंब, मनस्ताप यांचा हा संकेत आहे.
महिलांसाठी डावा डोळा फडफडणे शुभ मानले जाते. महिलांचा डावा डोळा फडफडणे हे चांगली बातमी, इच्छा पूर्ण होणे, लाभ किंवा आनंददायी घटना याचे संकेत मानले जाते.
महिलांचा बाहेर जाताना उजवा डोळा फडफडल्यास ते अशुभ मानले जाते. कामात अडथळा, चिंता किंवा अप्रिय बातमी येण्याची शक्यता असते.
डोळा फडफडण्यामागे थकवा, ताण, झोपेची कमतरता, जास्त कॅफीन, डोळ्यांचा ताण यांसारखी सामान्य कारणेही असू शकतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.