Heart-Tea : चहाप्रेमींसाठी धोक्याची घंटा! चहा प्यायल्यानंतर हृदयाची धडधड वाढते? दुर्लक्ष करणे पडेल महागात

Shreya Maskar

चहा पिण्याची सवय

अनेकांना दिवसातून ४-५ कप चहा पिण्याची सवय असते. जास्त चहा तुमच्या हृदयाचे आरोग्य बिघडवू शकते, त्यामुळे वेळीच सावध व्हा.

drinking tea | pinterest

आरोग्य तज्ज्ञ

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चहा प्यायल्यानंतर काही लोकांच्या हृदयाची धडधड वाढू शकते. यामागे मुख्य कारण चहातील कॅफिन असू शकते. कॅफिनचा हृदयावर गंभीर परिणाम होतो.

Health expert | pinterest

चहा - हृदयाची धडधड

कॅफिन हे stimulant (उत्तेजक-घटक ) आहे. जे मेंदू आणि मज्जासंस्थेचे कार्य वाढवते, त्यामुळे काही लोकांमध्ये हृदयाचे ठोके वेगाने जाणवतात किंवा धडधड जाणवते.

Tea - heart palpitations | pinterest

कॅफिन

कॅफिनमुळे काही वेळासाठी ॲड्रेनालिनची (Hormone-संप्रेरक) क्रिया वाढू शकते, ज्यामुळे हृदयाची गती आणि जागरूकता वाढते.

Caffeine | pinterest

झोप

रिकाम्या पोटी, जास्त प्रमाणात किंवा कमी झोपेत चहा घेतल्यास संवेदनशील व्यक्तींना हा परिणाम अधिक जाणवू शकतो.

sleep | pinterest

किती चहा घ्यावा?

चहामुळे वारंवार धडधड होत असेल तर चहाचे प्रमाण कमी करा. दिवसातून एकदा चहा पिणे योग्य ठरेल.

How much tea to take? | pinterest

डॉक्टरांचा सल्ला

धडधड वारंवार होत असेल, खूप वेगाने/अनियमित ठोके जाणवत असतील, त्यासोबत छातीत दुखणे, श्वास लागणे, चक्कर येणे किंवा बेशुद्धी असेल तर वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.

Doctor's advice | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : अनवाणी पाय अन् ऑक्टोबरचा तडाखा; नवरात्रीत 'अशी' घ्या काळजी, नाहीतर...

Navratri-October Heat | AI PHOTO
येथे क्लिक करा...