Navratri-October Heat : अनवाणी पाय अन् ऑक्टोबरचा तडाखा; नवरात्रीत 'अशी' घ्या काळजी, नाहीतर...

Shreya Maskar

नवरात्री

शारदीय नवरात्री 11 ऑक्टोबर 2026 रोजी असून सर्वत्र नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. 20 ऑक्टोबर रोजी विजयादशमी (दसरा) आहे.

Navratri | pinterest

नवरात्रीचा उपवास

नवरात्रीत काही लोक मनोभावे ९ दिवस उपवास करतात, त्यात ती अनवाणी देखील चालतात. ऑक्टोबरच्या तडाख्यात अनवाणी चालल्यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे स्वतःची विशेष काळजी घ्या.

Navratri Fasting | pinterest

पायांची त्वचा भाजणे

उन्हात तापलेली फरशी, डांबरी रस्ता किंवा वाळू पायांच्या त्वचेला भाजू शकते. यामुळे त्वचा लाल होणे, तीव्र वेदना होणे, फोड येणे, गंभीर त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

Burning of Foot Skin | pinterest

मधुमेह

मधुमेहामुळे काही व्यक्तींच्या पायांमधील संवेदना कमी होऊ शकतात आणि रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भाजणे किंवा जखम झाल्याचे लगेच लक्षात येत नाही.

Diabetes | pinterest

डिहायड्रेशन

तुम्ही उपवासात उन्हात अनवाणी चाललात तर डिहायड्रेशनची समस्या उद्भवेल. शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येणे आणि थकवा जाणवू शकतो.

Dehydration | pinterest

उपाय काय?

दुपारच्या कडक उन्हात चालणे टाळा. उन्हात जास्त वेळ राहणार असल्यास पुरेसे पाणी प्या. उन्हातून घरी आल्यावर पाय स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

Drink plenty of water | pinterest

'या' लोकांनी उपवास टाळा

मधुमेह, बीपी, वृद्ध आणि लहान मुलांनी नवरात्रीचा उपवास करणे सहसा टाळावे. उपवास आणि अनवाणी पायाने उन्हात चालल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

barefoot walking | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

barefoot walking | pinterest

NEXT : पायांच्या मध्ये उशी ठेवून झोपण्याचे ७ आश्चर्यकारक फायदे, शरीरात वेदना कधी जाणवणारच नाही

Sleeping Technique | AI PHOTO
येथे क्लिक करा...