Ankush Dhavre
तुम्हाला रोज एक तरी भिकारी दिसत असेल, तो तुमच्याकडून १,२ रुपये घेत असेल.
कधी विचार केलाय का, एक भिकारी एका दिवसाला किती रुपयांची कमाई करत असेल?
जगातील सर्वात श्रीमंत भिकाऱ्याची कमाई ही MBA पासआऊटपेक्षाही अधिक आहे.
एक MBA पासआऊट जितकी कमाई करत असेल, तितकीच कमाई हा सिग्नलवर उभा राहुन भिक मागून करतो.
या भिकाऱ्याचं नाव आहे, भरत जैन. जो भिक मागून ६० ते ७० हजारांची कमाई करतो. (हा फोटो भरत जैनचा नाहीये)
माध्यमातील वृत्तानुसार, त्याची नेटवर्थ ७.५ कोटी रुपये आहे.
त्याचे मुंबईत १.४ कोटी किंमतीचे २ अलिशान फ्लॅट आहेत.
यासह त्याची काही दुकानं देखील आहेत, ज्याचं भाडं ३० हजार रुपये आहे.