Rice Manchurian Recipe: उरलेल्या भातापासून घरी बनवा टेस्टी स्पायसी राईस मंचुरियन, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

राईस मंचुरियनसाठी शिजवलेला भात, बारीक चिरलेला कांदा, गाजर, कोबी, शिमला मिरची, कॉर्नफ्लोअर, मैदा, आलं-लसूण पेस्ट, सोया सॉस, टोमॅटो सॉस, चिली सॉस, मीठ आणि तेल घ्या.

Rice Manchurian Recipe

मंचुरियनचे गोळे तयार करा

एका भांड्यात शिजवलेला भात, बारीक चिरलेल्या भाज्या, थोडे कॉर्नफ्लोअर, मैदा, मीठ आणि आलं-लसूण पेस्ट घालून सर्व मिश्रण चांगले एकत्र करा. त्याचे छोटे गोल गोळे तयार करा.

Crispy Manchurian Recipe

मंचुरियन बॉल्स तळून घ्या

कढईत तेल गरम करून तयार केलेले भाताचे गोळे मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तळलेले बॉल्स प्लेटमध्ये काढून ठेवा.

Rice Manchurian Recipe

चवदार सॉस तयार करा

कढईत थोडे तेल घेऊन त्यात बारीक चिरलेले आलं, लसूण आणि हिरवी मिरची परतून घ्या. त्यात कांदा आणि शिमला मिरची घालून मोठ्या आचेवर परता.

Manchurian Crispy Recipe | Picsart

सॉसमध्ये चटपटीत चव आणा

आता त्यात सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि चिली सॉस घाला. आवश्यकतेनुसार मीठ आणि थोडी काळी मिरी घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिसळा.

Manchurian Recipe | Yandex

मंचुरियन बॉल्स सॉसमध्ये मिसळा

तयार केलेले कुरकुरीत मंचुरियन बॉल्स कढईतील सॉसमध्ये घाला. बॉल्स तुटणार नाहीत याची काळजी घेत हलक्या हाताने सर्व मिश्रण एकत्र करा.

Manchurian Recipe

गरमागरम सर्व्ह करा

तयार राईस मंचुरियनवर बारीक चिरलेली स्प्रिंग ओनियन आणि कोथिंबीर घाला. गरमागरम राईस मंचुरियन सॉससोबत किंवा फ्राइड राईससोबत सर्व्ह करा.

Manchurian Recipes | Saam TV

Vaidehi Parshurami: समुद्रकिनारी खुललं अभिनेत्रीचं सौदर्यं; वैदेही परशुरामीचा शिमरी गाऊनमध्ये ग्लॅमरल लूक व्हायरल

vaidehi parshurami | Saam Tv
येथे क्लिक करा