Rice Kheer Recipe: गोडधोड खाण्याची इच्छा झालीय? घरच्या घरी बनवा स्वादिष्ट तांदळाची खीर; वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

लागणारे साहित्य

१/४ कप तांदूळ, १ लिटर दूध, १/२ कप साखर, ४-५ वेलची, ८-१० बदाम, ८-१० काजू, काही मनुका आणि थोडे केशर (ऐच्छिक).

Rice Kheer Recipe | Saam Tv

तांदूळ स्वच्छ धुवून भिजवा

तांदूळ स्वच्छ धुऊन २०-३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. यामुळे तांदूळ लवकर शिजतात आणि खिरीला छान पोत मिळतो.

Rice Kheer Recipe | Saam Tv

दूध उकळून घ्या

जाड बुडाच्या भांड्यात दूध गरम करा. दूध उकळू लागल्यावर गॅस मंद करा आणि अधूनमधून ढवळत राहा.

Rice Kheer Recipe | google

तांदूळ शिजवा

भिजवलेले तांदूळ दुधात घाला आणि मंद आचेवर शिजू द्या. तांदूळ पूर्णपणे मऊ होईपर्यंत आणि दूध किंचित घट्ट होईपर्यंत शिजवा.

Kheer Recipe

साखर आणि वेलची घाला

तांदूळ शिजल्यानंतर त्यात साखर आणि वेलची पूड घाला. साखर विरघळेपर्यंत खीर सतत ढवळत राहा.

Kheer Recipe

ड्रायफ्रूट्स मिसळा

बदाम, काजू आणि मनुका घालून खीर आणखी ५ मिनिटे शिजवा. आवडत असल्यास केशरही घालू शकता.

Rice Kheer Recipe

गरम किंवा थंड सर्व्ह करा

तयार खीर गरमागरम किंवा फ्रिजमध्ये थंड करून सर्व्ह करा. वरून थोडे ड्रायफ्रूट्स घालून सजवल्यास चव आणखी वाढते.

Rice Kheer Recipe | Saam Tv

Hair Care: सुंदर केसांसाठी मोजावी लागू शकते मोठी किंमत; हेअर स्मूथनिंगने होतील हे साइड इफेक्ट, वाचा परिणाम

Hair Care | Saam Tv
येथे क्लिक करा