Hair Care: सुंदर केसांसाठी मोजावी लागू शकते मोठी किंमत; हेअर स्मूथनिंगने होतील हे साइड इफेक्ट, वाचा परिणाम

Shruti Vilas Kadam

केस गळण्याची समस्या वाढू शकते

स्मूथनिंग प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे केसांची मुळे कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे काही लोकांमध्ये केस गळण्याचे प्रमाण वाढू शकते.

Hair Smoothening Mask | Saam Tv

केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात

वारंवार स्मूथनिंग केल्यास केसांतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. परिणामी केस कोरडे, निस्तेज आणि तुटणारे होऊ शकतात.

Hair Smoothening Mask | Saam TV

टाळूवर (Scalp) जळजळ होऊ शकते

उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या केमिकल्समुळे काही लोकांना टाळूवर खाज, जळजळ किंवा लालसरपणा जाणवू शकतो.

Hair Smoothening Mask | Saam tv

केसांची नैसर्गिक रचना बदलते

स्मूथनिंगनंतर केसांचा मूळ पोत बदलतो. त्यामुळे नैसर्गिक कुरळे किंवा लहरी केस कायमचे बदलण्याची शक्यता असते.

Hair Smoothening Mask | Saam Tv

अॅलर्जीची समस्या उद्भवू शकते

काही व्यक्तींना स्मूथनिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे अॅलर्जिक प्रतिक्रिया येऊ शकतात. त्यामुळे उपचारापूर्वी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे.

hair care | Saam TV

केस तुटण्याची शक्यता वाढते

उच्च तापमानाच्या स्ट्रेटनिंग उपकरणांचा वापर केल्याने केस कमकुवत होऊन तुटू शकतात.

Hair Care | Saam Tv

देखभालीचा जास्त खर्च

स्मूथनिंगनंतर विशेष शॅम्पू, कंडिशनर आणि हेअर केअर उत्पादनांचा वापर करावा लागतो. त्यामुळे नियमित देखभालीचा खर्च वाढू शकतो.

Hair Care | Saam tv

Health care: ना वजन वाढेल, ना पोट सुटेल, जेवणानंतर फक्त ५ मिनिटं करा हा सोपा व्यायाम

Weight Loss | pinterest
येथे क्लिक करा