Manasvi Choudhary
मानसिक ताण, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, प्रदूषण आणि धुळीमुळे त्वचेवर परिणाम होतो. त्वचा निस्तेज होणे, त्वचेवर पुरळ येणे, काळे डाग येणे यासारख्या त्वचेच्या समस्या उद्भवतात.
अनेक महिला व मुली त्वचेवर उपाय म्हणून पार्लरमध्ये ट्रिटमेंट घेतात मात्र यामुळे त्वचा आणखी खराब होते. बाजारातील केमिकलयुक्त प्रोडक्ट्समुळे त्वचेला हानी पोहचते. त्वचा लाल होते.
त्वचेवर नैसर्गिकरित्या चमक आणण्यासाठी पार्लरऐवजी तुम्ही घरीच स्वयंपाकघरातील वस्तूंचा सोप्या पद्धतीने वापर करा.
स्वयंपाकघरातील तांदळाचे पीठ, कच्चे दूध आणि मध हे त्वचेच्या सौंदर्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्याचा वापर कसा करायचा ते स्टेप बाय स्टेप पाहा.
१) सर्वातआधी एका भांड्यात तांदळाचे पीठ घ्या. त्यात कच्चे दूध आणि मध मिक्स करा.
२) हे मिक्स केले मिश्रण घट्ट ठेवा यामुळे चेहऱ्यावर सहजपणे लावू शकता.
३) चेहऱ्यावर होममेड फेस मास्क लावण्यासाठी सर्वात पहिले चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.
४) साधारण २ ते ३ मिनिटे हलक्या हाताने मसाज केल्यानंतर १० मिनिटे हा मास्क चेहऱ्यावर राहू द्या नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
५) चेहऱ्यावर फेस मास्क लावल्याने चेहरा उजळेल. फेस मास्क चेहऱ्यावरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.