Surabhi Jayashree Jagdish
तांदळाची उकड करून बनवलेली भाकरी दोन दिवस टिकते. मात्र जर भाकरी चुकीच्या पद्धतीने बनवली तर ती चार-पाच तासांत कडक होते. प्रवासात तांदळाची भाकरी नेण्यास अनेकदा टाळलं जातं.
अनेकांना तांदळाची भाकरी आवडते. मात्र प्रवासात ही भाकरी नेताना काही टीप्स फॉलो करणं गरजेचं आहे. योग्य पद्धतीने भाकरी केली तर ती तुटत नाही. शिवाय दोन दिवस ठेवल्यासही ती खराब होत नाही.
तांदळाचं पीठ, पाणी, मीठ आणि तेल गरजेनुसार वापरावं. हे साहित्य साधं असून घरात सहज उपलब्ध असतं. योग्य प्रमाणात वापरल्यास भाकरी मऊ होते.
एका भांड्यात आवश्यकतेनुसार पाणी गरम करून त्यात चवीनुसार मीठ घाला. गरज वाटल्यास तेलही घालू शकता. पाणी नीट उकळल्यावरच पुढची प्रक्रिया सुरू करा.
पाण्याला उकळी आल्यावर त्यात हळूहळू तांदळाचं पीठ टाका. हे मिश्रण नीट एकजीव करून घ्या. मात्र पाणी उकळण्याआधी पीठ टाकू नका, नाहीतर उकड व्यवस्थित होणार नाही.
उकड थोडीशी कोमट झाल्यावर हाताला थोडं तेल किंवा पाणी लावून पीठ चांगलं मळा. नीट मळल्याने भाकरी मऊसर होते.
पिठाचा गोळा घेऊन पोळपाटावर हाताने गोल फिरवत किंवा बोटांच्या साहाय्याने भाकरी थापा. आगरी पद्धतीनुसार एका हातावर पीठ लावून दुसऱ्या हाताने भाकरी थापली जाते.
गरम तव्यावर भाकरी टाका. ती थोडी फुगली की दोन्ही बाजूंनी चांगली भाजून घ्या. नीट भाजल्याने भाकरी टिकाऊ होते आणि चविष्ट लागते.
मऊ भाकरीसाठी गरम पाण्याचा वापर आणि योग्य प्रकारे मळणं गरजेचं आहे. तेल टाकल्यास भाकर ओलसर होत नाही आणि भाजताना तव्याला चिकटत नाही. या टिप्स फॉलो प्रवासात तुम्ही भाकरी घेऊन जाऊ शकता.