Manasvi Choudhary
स्वच्छ, चमकदार त्वचेसाठी महिला व मुली अनेक घरगुती उपाय करतात. आजकाल बाजारातील केमिकलयुक्त उत्पादनांपेक्षा घरगुती उपाय केले जातात.
तुम्ही कधी भाताचा फेसपॅक चेहऱ्यावर लावलाय का? भाताचा फेसपॅकने चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.
तांदूळ आणि तांदळाच्या पाण्याचा त्वचेसाठी वर्षानुवर्षे वापर केला जात आहे. तांदळामध्ये नैसर्गिक अँटी-ऑक्सिडंट्स, अमिनो अॅसिड आणि व्हिटॅमिन बी असते जे त्वचेवरील डाग कमी करतात. त्वचा मऊ आणि चमकदार बनवतात.
भाताचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने डेड स्किन निघून जाते आणि त्वचा लगेचच टवटवीत आणि उजळ दिसते.
तांदळामधील गुणधर्मामुळे त्वचेवर सुरकुत्या येत नाही. त्वचा दिर्घकाळ फ्रेश दिसते.
त्वचेवर काळे डाग असतील तर तुम्ही तांदळाचा फेसपॅक लावा यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात.