Manasvi Choudhary
पावसाळ्यात रानभाज्या खाल्ल्या जातात. या भाज्या औषधी असतात. आरोग्यासाठी देखील या भाज्या पौष्टिक मानल्या जातात.
कोरळ भाजी ही पावसाळ्यात मिळणारी आरोग्यासाठी गुणकारी असणारी रानभाजी म्हणजे आहे.
कोरळ ही भाजी तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता. एकदम सोपी रेसिपी आहे.
भाजी बनवण्यासाठी कोरळची कवळी पाने भाजी, तेल, जिरे, लसूण, कांदा, हिरवी मिरची, हळद, टोमॅटो, मीठ हे साहित्य घ्या.
सर्वातआधी कोरळ या भाजीची पाने आणि देठ निवडून स्वच्छ धुवून घ्या.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये जिरे आणि लसूण चांगला परतून घ्या. लसूण चांगला परतून घेतल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची परतून घ्या.
मिश्रणात बारीक चिरलेला टोमॅटो, हळद आणि चवीनुसार मीठ घालून संपूर्ण मिश्रण एकजीव करा.
आता धुवून घेतलेली कोरळची भाजी मिश्रणात टाका आणि भाजी वाफेवर शिजवून घ्या.
भाजी शिजली की त्यात खोबरे आणि गुळाचा किस मिक्स करा.