Shruti Vilas Kadam
18 वर्षांवरील व्यक्तीला एका जेवणात साधारण अर्धा ते एक कप शिजवलेला भात खाल्ला पाहिजे. हे प्रमाण वैयक्तिक गरज आणि इतर पदार्थांच्या प्रमाणानुसार बदलते.
वजन कमी करण्यासाठी भात पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. एका वेळेच्या जेवणात भाताचे प्रमाण मर्यादित ठेवून त्यासोबत डाळ, भाज्या आणि प्रोटिन असलेले पदार्थ खा. दिवसभरातील एकूण कॅलरीजचा विचार करणे अधिक महत्त्वाचे आहे.
पांढरा भात आणि ब्राऊन राइस दोन्ही आहारात समाविष्ट करता येतात. ब्राऊन राइसमध्ये पांढऱ्या भाताच्या तुलनेत फायबर अधिक असते. त्यामुळे तो पोट जास्त वेळ भरलेले राहण्यास मदत होते.
भातासोबत डाळ, उसळ, पालेभाज्या, कोशिंबीर, दही किंवा इतर प्रोटिन असलेले पदार्थ खा. अशा संतुलित आहारामुळे शरीराला कार्बोहायड्रेट्स, प्रोटिन, फायबर, जीवनसत्त्वे मिळतात.
डायबिटिज असलेल्या व्यक्तींनी भाताचे प्रमाण आणि जेवणातील एकूण कार्बोहायड्रेट्स याकडे लक्ष द्यावे. योग्य प्रमाणासाठी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
रात्री भात खाल्ल्याने आपोआप वजन वाढते, असे नाही. दिवसभरातील एकूण कॅलरीजचा परिणाम झाल्याने वजन वाढते. त्यामुळे रात्री थोडा भात खाल्ला तरी चालते.
भात खाताना ताटात भाज्या, प्रोटिन आणि इतर पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. भाताचे प्रमाण आपल्या भुकेनुसार ठरवा. केवळ भातावर अवलंबून न राहता सॅलाड देखील खा.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.