Ruchika Jadhav
तांदळाची भाकरी अनेक महिलांना परफेक्ट पद्धतीने बनवता येत नाही.
भाकरी बनवल्यावर काही वेळाने ती कडक होते.
तांदळाची भाकरी बनवण्यासाठी फार सिंपल ट्रीक वापरावी लागते.
यासाठी बारीक दळलेले तांदूळ घ्या. शक्यतो तांदळाचं पीठ गिरणीवर दळून आणलेलं असावं.
भाकरी बनवण्याआधी तुमच्या अंदाजानुसार एका पातेल्यात पाणी तापायला ठेवा.
या पाण्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ टाकून घ्या.
गरम पाण्यात पीठ चांगलं मळून घ्या आणि सुक्क्या पीठाचा वापर न करता पाण्याच्या सहाय्याने भाकरी थापून घ्या.
तयार भाकरी शेकताना तवा नेहमी तापलेला असावा. तवा तापलेला नसेल तर भाकरी टम्म फुलत नाही.