Shruti Vilas Kadam
RH Null हा रक्तगट असा आहे की त्यात RH प्रणालीतील सर्व अँटीजन्स अनुपस्थित असतात.
आजपर्यंत संपूर्ण जगात केवळ ५० ते ५५ लोकांमध्ये हा रक्तगट आढळलेला आहे.
याला “Golden Blood” (सोन्यासारखं रक्त) असेही म्हटले जाते कारण याचा उपयोग कोणत्याही RH रक्तगटाला दिला जाऊ शकतो.
RH Null असलेल्या व्यक्तींना रक्ताची गरज भासल्यास जगभरात मिळणं कठीण असते कारण हे फार थोड्या लोकांकडे असते.
अशा व्यक्तींना गंभीर दुखापत किंवा सर्जरीमध्ये धोका अधिक असतो कारण त्यांच्यासाठी योग्य रक्त मिळणे कठीण आहे.
हा रक्तगट विशेष ब्लड टेस्टिंगद्वारे ओळखला जातो आणि सर्वसामान्य चाचण्यांमध्ये दिसून येत नाही.
RH Null रक्तगटाचे नमुने वैज्ञानिक संशोधनासाठी खूप मौल्यवान मानले जातात, विशेषतः इम्युनोहेमाटोलॉजी क्षेत्रात.