Shreya Maskar
येणाऱ्या वीकेंडला तुम्ही पुण्याला ट्रिप प्लान करा. येथे एक निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळेल, ज्याला 'रिव्हर्स वॉटरफॉल' म्हणतात.
महाराष्ट्रातील 'रिव्हर्स वॉटरफॉल' (उलटा धबधबा) जुन्नरजवळ पश्चिम घाटातील नाणेघाट येथे ठाणे आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. येथे निसर्गाचा अद्भूत नजारा पाहायला मिळतो.
नाणेघाट हे पावसाळ्यातील 'रिव्हर्स वॉटरफॉल' (उलट्या दिशेने वाहणारा धबधबा) यासाठी प्रसिद्ध आहे. यात दरीतून वाहणारे जोरदार वारे खाली पडणाऱ्या पाण्याला थेट आकाशाच्या दिशेने वर ढकलतात, ज्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या नियमांना छेद देणारा वरच्या दिशेने जाणारा प्रवाह तयार होतो.
निसर्गाचा हा अद्भूत नजारा पाहायचा असेल तर पावसाळ्यात, विशेषतः जुलै ते सप्टेंबरला येथे नक्की भेट द्या. निसर्गाचे सुंदर फोटोज क्लिक करा.
मुंबईहून माळशेज घाट परिसराच्या दिशेने सुमारे १२० ते १२० ते १४० किलोमीटरचा प्रवास करून तुम्ही नाणेघाट रिव्हर्स वॉटरफॉलपर्यंत पोहोचू शकता.
'रिव्हर्स वॉटरफॉल' ला गेल्यावर सातवाहन राजवटीतील प्राचीन काळातील खडकात कोरलेल्या गुहा आणि शिलालेख पाहायला मिळतात. हे इतिहासातील महत्त्वाचा ठिकाणांपैकी एक आहे.
पावसाळ्यात डोंगरावर धुक्याची चादर पाहायला मिळते. तसेच येथे इंद्रधनुष्याचा खूपच सुंदर नजराणा पाहायला मिळतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.