Shreya Maskar
सणासुदीला आपण पारंपरिक पोषाखाला प्राधान्य देतो. मुली साड्या आणि लेहेंगे वेगवेगळ्या पद्धतीने स्टाइल करतात.
तुम्ही आईच्या जुन्या प्रिंटेड साड्या अशाप्रकारे स्टाइल करा ही सर्वणज तुमच्या फॅशनचे कौतुक करतील.
आईची जुनी बांधणी प्रिंटची साडी नेसा. त्यावर चांदीच्या रंगाचे ऑक्सिडाइज्ड दागिने घाला. नेकपीस, कानातले, बांगड्या, ब्रेसलेट्स घाला.
बांधणी साडीवरचा मॅचिंग ब्लाउज घालण्यापेक्षा साडीला कॉन्ट्रास्ट ब्लाजची निवड करा. पफ-स्लीव्ह ब्लाउज निवडा. यामुळे फॅशनेबल आणि स्टायलिश दिसाल.
तुम्हाला साडीला बॉसी आणि क्लासी लूक द्यायचा असेल तर सिंपल कोणतीही प्रिंट नसलेले लाँग जॅकेट किंवा श्रग घाला. यामुळे साडीला फ्यूजन लूक मिळतो.
साडीवर स्टायलिश बेल्ट लावल्याने लूक अधिक स्मार्ट आणि आकर्षक दिसतो. तसेच तुम्ही उंच दिसाल.
नेहमीची सहावारी साडी नेसण्यापेक्षा धोती स्टाइल, गुजराती स्टाइल किंवा मॉडर्न ड्रेपिंग करून साडीला नवीन लूक द्या.
हिल्स, कोल्हापुरी चप्पल किंवा स्टायलिश सॅंडल्स घालून लूक पूर्ण करा. यात तुम्ही खूपच स्टायलिश आणि मॉडर्न दिसाल.
NEXT : ना स्टाइल, ना फॅशन; 'या' ३ प्रकारच्या साड्या चुकूनही खरेदी करू नका, दिसेल 'आऊटडेटेड' लूक