Ruchika Jadhav
पनीर भुर्जी अशी भाजी जी जेवणासह तुम्ही नाश्तामध्ये देखील खाऊ शकता.
रेस्टॉरंट स्टाइल पनीर भुर्जी बनवणे फार सोप्प आहे. त्यासाठी फ्रेश पनीर घ्या.
भुरजी बनवायची असल्याने पनीर क्यूब चांगल्यापद्धतीने कुसकरून घ्या.
आपल्या आवडीनुसार कांदा बारीक चिरून घ्या.
तसेच भुरजीमध्ये बारीक हिरवी मिरची देखील टाका.
लालबुंद टोमॅटो बारीक कापून घ्या. टोमॅटोच्या फोडी जास्त मोठ्या ठेऊ नका.
तसेच तुमच्या आवडीनुसार तेलाच्या फोडणीत कांदा, टोमॅटो शिजल्यावर मीठ, तिखट, हळद टाकून मिक्स करून घ्या.
तयार झाली तुमची चमचमीत भुर्जी. ही भुर्जी तुम्ही खाण्याआधी त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्या.