Manasvi Choudhary
पावसाळ्यात बाहेरील अन्नपदार्थ खाणे अनेकजण टाळतात. यासाठी आज आम्ही तुम्हाला हॉटेल स्टाईल व्हेज मंचाव सूप बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.
घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने व्हेज मंचाव सूप ही रेसिपी ट्राय करू शकता.
सूप बनवण्यासाठी गाजर, सिमला मिरची, फरसबी शेंगा, कॉर्न, कांद्याची पात, तेल, अमूल बटर, आलं, हिरवी मिरची, लसूण, काळी मिरी पावडर, कॉर्नफ्लोअर, चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो, मीठ, न्यूडल्स साहित्य घ्यावे.
सूप बनवण्यासाठी गाजर, शिमला मिरची, फरसबी, कांद्याची पात, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण हे सर्व बारीक कापून घ्या.
नंतर एका पॅनमध्ये अमूल बटर टाका नंतर त्यात बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची व आलं छान परतून घ्या.
नंतर या मिश्रणात गाजर, फरसबी, शिमला मिरची आणि मक्याचे दाणे घालून चांगले परतून घ्या. या मिश्रणात चवीनुसार मीठ मिक्स करा.
या मिश्रणात चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो सॉस घालून सर्व एकजीव करा. नंतर त्यात पाणी मिक्स करा.
सूप उकळल्यानंतर त्यात कॉर्नफ्लॉअर मिक्स करा म्हणजे सूप घट्ट होईल. एका भांड्यात पाण्यामध्ये न्यूडल्स शिजवून घ्या. नंतर त्यात कॉर्न फ्लोअर मिक्स करा.
एका कढईमध्ये गरम तेलामध्ये न्यूडल्स फ्राय करा. छान कुरकुरीत तळलेले न्यूडल्स सूपमध्ये मिक्स करून सर्व्ह करा.