Siddhi Hande
पनीर चिली हा पदार्थ लहानापांसून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातात.
पनीर चिली बनवण्यासाठी पनीर, भाज्या, मैदा, कॉर्नफ्लोर, मिरची पावडर,आलं-लसूण पेस्ट आणि कारी मिरी पावडर हे साहित्य लागते.
सर्वात आधी तुम्हाला पनीरचे चौकोनी तुकडे करायचे आहे. या तुकड्यांना मैदा, कॉर्नफ्लोर, आलं-लसूण पेस्ट, काळी मिरी पावडर आणि मीठ लावा.
यानंतर एका कढईत तेल गरम करा. त्यात पनीर तुकडे सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
यानंतर कढईत तेल गरम करा. त्यात आलं-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची परतून घ्या.
यानंतर कांदा आणि शिमला मिरची टाकून परतून घ्या.
यानंतर त्यात सोया सॉस, चिली सॉस, व्हिनेगर आणि थोडं पाणी टाकून मिक्स करा.
यानंतर त्यात पनीर घालून मिक्स करा. हे पनीर थोडं शिजवून घ्या.
यानंतर वरुन त्यावर कांद्याची पात टाकून मस्त सजवून घ्या.